पुणे । लोकसभा निवडणुकीच्या मैदानात जोरात उतरण्याची तयारी शरद पवार यांनी सुरु केली असून अशातच शरद पवार यांच्याकडून भाजपला धक्का देण्याची तयारी सुरु आहे.भाजपच्या बड्या नेत्याला लवकरच राष्ट्रवादीत प्रवेश देणार आहे. भाजपचे दिंडोरीतील माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण राष्ट्रवादीत जाण्याची शक्यता आहे.
माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण गेल्या काही महिन्यांपासून भाजपासून दूर आहेत. भाजपाच्या विद्यमान खासदार आणि केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारतीय पवारांसमोर हरिश्चंद्र चव्हाण मैदानात उतरण्याची शक्यता आहे. हरिश्चंद्र चव्हाण राष्ट्रवादीत गेले तर भाजपला दिंडोरी लोकसभेत फटका बसू शकतो. गेल्या लोकसभा निवडणुकीत विद्यमान खासदार असताना भाजपाने हरिश्चंद्र चव्हाण यांची उमेदवारी काढून भारती पवार यांना उमेदवारी दिली होती. यामुळे हरिश्चंद्र चव्हाण पक्षावर नाराज होते. आता ते राष्ट्रवादीच्या वाटेवर आहे.
नाशिक लोकसभा मतदार संघासाठी शांतीगिरी महाराज इच्छूक आहेत. त्यासाठी त्यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. परंतु मंगळवारी श्रीकांत शिंदे यांनी नाशिकमधून विद्यामान खासदार हेमंत गोडसे यांची उमेदवारी जाहीर केली. यामुळे आपणास तिकीट मिळालं नाही तर अपक्ष लढणार असल्याची भूमिका शांतीगिरी महाराज यांनी मांडली. श्रीकांत शिंदे यांच्या घोषणेनंतर शांतिगिरी महाराज नाराज झाले आहेत. ते मविआ च्या कोणत्याही नेत्याच्या संपर्कात नाही.















Discussion about this post