रायगड । अजित पवार गटाला राष्ट्रवादी पक्षाचे मूळ नाव आणि घड्याळ चिन्ह मिळाल्यानंतर निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला तुतारी वाजवणारा माणूस असं निवडणूक चिन्ह दिलं आहे. या तुतारी चिन्हाचं शरद पवार यांनी शनिवारी (२४ फेब्रुवारी) रायगडावर जाऊन अनावरण केले.
छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्य जनतेची सेवा करणारे राज्य होते. आज राज्याची स्थिती बदलायची असेल, तर पुन्हा एकदा प्रयत्न करावे लागतील. निवडणूक आयोगाने रणशिंग फुकायला तुतारी दिली आहे. संघर्षातून प्रेरणा देणारी ही तुतारी आहे, असं शरद पवार यांनी यावेळी म्हटलं.
तुमच्या संघर्षातून, त्यागातून यश मिळणार याची खात्री आहे. या ऐतिसाहिक भूमीत आपण आलोय. याठिकाणाहून प्रेरणा घेऊन जनतेची सेवा करुया, असं म्हणत शरद पवार यांनी पक्षाचं नवीन चिन्ह जनतेपर्यंत पोहचवण्याचा सल्ला कार्यकर्त्यांना दिला. यावेळी रायगडावर तुतारीचा चांगलाच नाद घुमत होता.
Discussion about this post