जळगाव । राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचार सभेला वेग आला असून प्रमुख नेत्यांचे दौरे निश्चित झाले आहेत. यातच महाविकास आघाडीचे तीन नेत्यांचे जळगाव जिल्ह्यात सभा होणार आहे.
सोमवारी खासदार शरद पवार यांच्या चार तर उद्धव ठाकरेंच्या दोन सभा होतील. खासदार संजय राऊत हे दोन दिवस मुक्कामी थांबणार आहेत. सोमवारी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची चाळीसगाव येथे दुपारी १२ वाजता तर चोपडा येथे सायंकाळी ७ वाजता सभा होणार आहे. त्यासाठी ठाकरे विमानाने जळगावला येतील. तेथून हेलिकॉप्टरने चाळीसगावला जातील. खासदार शरद पवार हे सोमवारी सकाळी जालना येथून पारोळा येथे सकाळी ११ वाजता जाहीर सभेला हजेरी लावतील.
त्यानंतर दुपारी २ वाजता शिंदखेडा येथून निघून जामनेरला चार वाजता सभा घेतील. ५ ते ६.३० वाजेदरम्यान मुक्ताईनगरला व त्यानंतर धरणगाव येथे ७.३० ते ९ वाजेदरम्यान जाहीर सभा होणार आहे. शरद पवार हे सोमवारी जळगावात मुक्कामी थांबणार आहेत. खासदार संजय राऊत हे देखील १३ व १४ नोव्हेंबर असे दोन दिवस जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. यात ठाकरे गटाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी त्यांचे प्रत्येक मतदारसंघात सभांचे नियोजन सुरू झाले असल्याचे संबंधित पक्षांनी सांगितले.















Discussion about this post