पुणे : आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन राज्य सरकारनं महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. या योजनेंतर्गत पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये देण्यात येणार आहे. अजित पवारांनी अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा केली. मात्र या योजनेवरून शरद पवारांनी अजित पवारांना टोला लगावला. पुण्यातील पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी लाडक्या बहीण योजनेवरून सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला.
काय म्हणाले शरद पवार?
शरद पवार म्हणाले, ‘लाडकी बहीण, लाडका भाऊ या योजना अलीकडच्या बजेटमध्ये पाहिल्या. अजित पवार इतके वर्ष अर्थमंत्री आहेत. त्यांना इतक्या वर्षात भाऊ बहीण कधी आठवली नाहीत’.
‘लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा हा सर्व परिणाम आहे. मला यात राज्याच्या आर्थिक स्थितीची काळजी आहे. सध्या राज्याची आर्थिक स्थिती सध्या काही ठीक दिसत नाही. राज्यावरील कर्जाचा विचार व्हायला हवा, असेही शरद पवारांनी पुढे सांगितले.
छगन भुजबळ यांच्या भेटीवर भाष्य करताना शरद पवार म्हणाले, ‘छगन भुजबळ यांची अलीकडची दोन-तीन भाषणे चांगली झाली आहेत. ते मला दोन-तीन विषयांवर बोलले. मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलावली होती. मनोज जरांगे पाटील आणि मुख्यमंत्र्यांचा संयुक्त कार्यक्रम पाहिला आहे. त्याचा काहीतरी डायलॉग होता. ओबीसींचे आंदोलन सोडवण्यासाठी चार-पाच मंत्री गेले होते. या दोन्ही ठिकाणी काय ठरले, जरांगे आणि ओबीसींना काय आश्वासन दिले हे जाहीर होत नाही. तोपर्यंत बैठकीला जाण्यात अर्थ नाही. ‘भुजबळांनी सांगितले की, झाले गेले सोडून द्या, काहीतरी मार्ग काढायला हवा. शातंता निर्माण करण्यासठी तुमची गरज असल्याचं मार्गदर्शन छगन भुजबळ यांनी केले आहे’, असेही ते म्हणाले.
Discussion about this post