जळगाव । यावल तालुक्यातील किनगाव जवळ शरद पवार यांच्या ताफ्यातील दोन वाहनाचा अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. चोपडावरून भुसावळकडे जाताना हा अपघात झाला आहे. यात कोणालाही दुखापत झाली नाही. मात्र, ताफ्यातील वाहनांचे नुकसान झाले आहे.
याबाबत असे की, शरद पवार आज जळगावच्या दौऱ्यावर असून चोपडा येथे रावेर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्या प्रचारार्थ सभा झाली. सभा आटोपल्यानंतर शरद पवार यांच्या वाहनांच्या ताफ्यातील सर्व मंडळी हे चोपडावरून भुसावळकडे चालले होते.
शरद पवार यांचा ताफा यावल तालुक्यातील किनगाव जवळ पोहोचला. त्यावेळी शरद पवार यांच्या वाहनांच्या ताफ्यातील कार दुसऱ्या वाहनाला धडकली. ताफ्यात शरद पवार यांच्या गाडीमागे असलेल्या ताफ्यातील दोन वाहने धडकले. या अपघातात कुणालाही दुखापत झालेले नाही. मात्र वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.















Discussion about this post