आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचं घोंगडं अजूनही भिजत आहे. दुसरीकडे भाजपने उमेदवारांची पहिली यादी जाहीरही केली आहे. मात्र आघाडीचं अजून जागा वाटपाची चर्चाच सुरू आहे. यातच येत्या सहा आणि सात मार्चला लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीपूर्वी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
वंचित बहुजन आघाडी जर महाविकास आघाडीसोबत आली तर नक्की आनंद वाटेल. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला चार ते पाच जागा देणं शक्य आहे. राष्ट्रीय समाज पक्षजर सोबत आला तर मी माझी माढा लोकसभेची जागा धनगर समाजास देण्यास तयार असल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, वंचितला या पाच जागांवर प्रकाश आंबेडकर समाधानी होणार का? प्रकाश आंबेडकर यावर आता आपली काय भूमिका मांडणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. वंचितला पाच जागा दिल्यानंतर महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचं सूत्र कसं राहणार? याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे.















Discussion about this post