जळगाव । राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आ.एकनाथराव खडसे यांच्या घरी आज दुपारी पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शरद पवार यांची सभा जळगाव शहरात घेण्यात येणार असल्याचे निश्चित झाले आहे.
दि.४ सप्टेबर रोजी राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचा जळगांव जिल्हा दौरा आयोजित करण्यात आला असून यासाठी नियोजन करण्याबाबत नुकतेच बैठक संपन्न झाली यावेळी जाहिर सभेचे देखील आयोजन करण्यात आले असून हि सभा सागर पार्क या मैदानावर होणार आहे. यासाटी पूर्ण नियोजन करण्यासाटी जळगांव जिल्हा व महानगर जळगांव यांची संयुक्त बैठक दिनांक २२ ऑगस्ट दुपारी एक वाजता बोलविण्यात देखील आली आहे.
याबैठकित जिल्हाअघ्यक्ष ॲन्ड भैय्यासाहेब रविन्द्र पाटील, माजी मंत्री एकनाथराव खडसे, माजी मंत्री गुलाबरावजी देवकर , महानगर जिल्हाध्यक्ष अशोक लाडवंजारी , महिला आघाडी जिल्हा अघ्यक्ष वंदनाताई चौधरी, महानगर महिला जिल्हाध्यक्ष मंगलाताई पाटील , राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष उमेश पाटील, आदिवासी विभाग जिल्हाध्यक्ष इब्राहिम तडवी, समाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष अशोक सोनवणे , जामनेर तालुका अघ्यक्ष विलास राजपुत, महानगर शहर संघटक राजु मोरे , महानगर जिल्हाउपंअघ्यक्ष किरणभाऊ राजपुत, मार्केट कमिटी संचालक डॉ.अरुण पाटील, समाजिक न्याय उपंअघ्यक्ष रमेशजी बारे , सदिप हिवाळे , सौरभ औचाडे , शुभम म्हस्के, राहुल टोके इतर पदाधिकारी कार्यकर्त उपस्थित होते
Discussion about this post