मुंबई | अजित पवार हे आमचे नेतेच असल्याचं शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे राष्ट्रवादीत फूट पडलेली आहे की नाही? असा सवाल केला जात आहे. त्यावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मोठं विधान यांनी मोठं विधान केलं आहे
संजय राऊत काय म्हणाले?
अजितदादा गटाने शरद पवार यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. ही फूट नाही तर काय आहे? राष्ट्रवादीत दोन दोन प्रदेशाध्यक्ष आहेत. ही फूट नाही तर काय आहे? असा सवालच संजय राऊत यांनी केला आहे. ते मीडियाशी संवाद साधत होते.
जशी शिवसेनेतून फुटून एक गट वेगळा झाला. पक्षाची भूमिका, पक्षप्रमुखांचा विचार बाजूला ठेवून भाजपबरोबर हातमिळवणी केली. हा पक्ष द्रोह आहे. त्यामुळे आम्ही त्यांची हकालपट्टी केली आहे. ही फूट आहे. त्याच पद्धतीने राष्ट्रवादीतून एक गट फुटला आणि पक्षाच्या विचारधारेविरुद्ध भाजपशी हातमिळवणी केली. त्यामुळे त्या पक्षाने अजित पवार यांच्यासह काही नेत्यांची हकालपट्टी केली. त्याला फूट नाही म्हणायचे तर काय म्हणायचे. ही फूटच आहे, असं संजय राऊत म्हणाले.