नवी दिल्ली । एनडीएतील घटक पक्षांच्या मदतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपलं सरकार स्थापन केलं आहे. मात्र हे सरकार काही महिन्यात कोसळणार असल्याचं विरोधकांकडून सांगितले जात आहे. याच दरम्यान, शरद पवार यांनी मोदी सरकारबाबतची मोठी भविष्यवाणी केली आहे. मोदी किती काळापर्यंत सत्तेत राहू शकतात, याचं भाकीतच शरद पवार यांनी केलं आहे.
चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांची भजापने साथ घेतली आहे. त्यामुळे भाजपच्या केंद्रातील सरकारला स्थैर्य आलं आहे. हे दोन्ही पार्टनर मोदी सोबत आहेत, तोपर्यंत मोदींना अडचण नाही, असं सूचक विधान शरद पवार यांनी केलं आहे. गेली 10 वर्ष सर्व सत्ता मोदींच्या हातात होती. आता त्या सत्तेत वाटेकरी आले आहेत. वाटेकरी आल्याने त्याचा परिणाम दिसतो का? हे आम्ही पाहत आहोत. पूर्वी एका मुठीत ही सत्ता होती. आता ती अवस्था राहिली नाही, असा टोला शरदप पवार यांनी लगावला.















Discussion about this post