रावेर | लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार महाविकास आघाडीतील उमेदवारांच्या प्रचार सभा जोरात घेत असून याच दरम्यान ते उद्या म्हणजेच ३ मे रोजी जळगाव दौऱ्यावर येत आहे. यादरम्यान ते रावेर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्या प्रचारासाठी तीन ठिकाणी सभा घेणार आहेत.
शरद पवार येत्या ३ मे रोजी जळगांव जिल्हयात येत आहेत. या दिवशी चोपडा व मुक्ताईनगर येथे शरद पवार यांच्या जाहीर सभांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच याच दिवशी भुसावळ येथे पवार यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीचा मेळावा होणार आहे.
रावेर लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्या प्रचारार्थ पक्षाध्यक्ष शरद पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे जिल्ह्याच्या दौर्यावर येत आहेत. त्यांच्या प्रमुख उपस्थितीत चोपडा येथे सकाळी साडे दहा वाजता जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर दुपारी सव्वा चार वाजता भुसावळ येथील संतोषी माता हॉलमध्ये महाविकास आघडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा होणार आहे. तर संध्याकाळी सात वाजता मुक्ताईनगर येथील कोथळी रोडवरील मुक्ताई क्रीडा संकुल येथे शरद पवार यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी अधिकाधिक संख्येने चोपडा, भुसावळ व मुक्ताईनगर येथे उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.















Discussion about this post