Wednesday, March 4, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जामनेरमध्ये शरद पवार गटाचा पराभव नेमका कशामुळे झाला? माजी खासदाराने केला मोठा गौप्यस्फोट

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
September 12, 2025
in जळगाव जिल्हा
0
.. अन्यथा आम्ही सुप्रीम कोर्टात जाणार; शरद पवार गटाचे निवडणूक आयोगाला पत्र, काय आहे मागणी?
बातमी शेअर करा..!

जळगाव । २०२४ मध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत जामनेर मतदार संघातून सलग सातव्यांदा भाजप नेते मंत्री गिरीश महाजन यांनी विजय मिळवला. त्यांनी शरद पवार गटाचे उमेदवार दिलीप खोडपे यांचा पराभव केला होता. दिलीप खोडपे यांनी एक लाखांवर मते मिळवली होती. या पार्श्वभूमीवर, जामनेरमध्ये चांगली ताकद असतानाही शरद पवार गटाच्या उमेदवाराचा पराभव नेमका कशामुळे झाला, त्याबाबतचा गौप्यस्फोट माजी खासदार ईश्वर जैन यांनी येथे केला.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगावात शरद पवार गटाचा मेळावा पार पडला. यादरम्यान माजी खासदार ईश्वर जैन यांनी मार्गदर्शन करताना महायुतीच्या सरकारवर टीका करण्याची संधी साधली. तसेच पक्ष संघटन वाढीसाठी प्रत्येकाने जबाबजारीने वागण्याचे आवाहन केले.

विधानसभेच्या निवडणुकीत पदाधिकारी व कार्यकर्ते ऐनवेळी कमी पडल्याने शरद पवार गटाच्या जिल्ह्यातील सर्व उमेदवारांचा पराभव झाल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. राज्यातील लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने मोठी मजल मारली असताना, शरद पवार गटाने १० पैकी तब्बल आठ जागा जिंकून दमदार कामगिरी केली होती. मात्र,  प्रचारादरम्यान उठलेल्या तुतारी आणि पिपाणीच्या गोंधळालाही मोठ्या प्रमाणात जबाबदार धरले गेले.

पक्षाकडून निवडणूक आयोगाला चिन्ह बदलण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, निवडणूक आयोगाने ती मागणी फेटाळून लावली. जामनेरमधील शरद पवार गटाच्या उमेदवाराला देखील निवडणुकीत पिपाणीमुळे फटका बसल्याचे माजी खासदार जैन म्हणाले.

जामनेरमधील विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे (शरद पवार) उमेदवार दिलीप खोडपे यांचा फक्त २६ हजार ८८५ मतांनी पराभव झाला. दुसरीकडे, शरद पवार गटाच्या तुतारी चिन्हाशी सारखेपणा राखणाऱ्या पिपाणी चिन्हावर निवडणूक लढणाऱ्या उमेदवाराने जवळपास १८ हजार मते घेतली. याशिवाय, बाहेरगावांहून अनेक गाड्या भरून लोक मतदान करण्यासाठी आले. गाड्यांमधून आलेले लोक जामनेर तालुक्यात राहतात, हे आम्हाला सुद्धा माहिती नाही. आम्ही झोपेत होतो. शेवटी आम्हाला तिथे हार पत्करावी लागली. या प्रकारापासून फक्त जामनेरकरांनीच नाही तर पक्षाच्या सर्व लोकांनी धडा घेतला पाहिजे, असे आवाहन माजी खासदार जैन यांनी शरद पवार गटाच्या मेळाव्यात केले.

बातमी शेअर करा..!
Previous Post

जळगावात पोलिसांच्या कारवाईत दोन गावठी पिस्तुल, 10 जिवंत काडतुसे जप्त; चौघांना अटक

Next Post

सामान्यांच्या खिशाला बसणार आणखी झळ! पितृपक्षातही सोने चांदी दरात वाढ

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
सोनं-चांदीच्या किमतीला लागली गळती! आता १० ग्रॅमचा दर हा आहे

सामान्यांच्या खिशाला बसणार आणखी झळ! पितृपक्षातही सोने चांदी दरात वाढ

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
देशाच्या राजकारणात मोठा उलटफेर; बिहारचं मुख्यमंत्रिपद भाजपकडे? नितीश कुमारांचं काय?

देशाच्या राजकारणात मोठा उलटफेर; बिहारचं मुख्यमंत्रिपद भाजपकडे? नितीश कुमारांचं काय?

March 4, 2026
उन्मेष पाटीलांच्या डाेक्यावर परिणाम, त्यांना वेड्या सारखे बडबड करायची सवय ; गिरीश महाजन

ठाकरे गटातून शिंदे गटात? उन्मेश पाटलांच्या पक्षांतरावर मंत्री महाजनांची प्रतिक्रिया, म्हणाले..

March 4, 2026
BSNL मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी, पगार ५०,००० रुपयांपर्यंत, पात्रता त्वरित जाणून घ्या

भारत संचार निगम लि.मध्ये सरकारी नोकरीची संधी; या पदासाठी भरती सुरु, पात्रता तपासून घ्या

March 4, 2026
जळगावात गारठा कमी होऊन तापमान वाढणार ; वाचा हवामान खात्याचा अंदाज

जळगावात हवामानाचा लहरीपणा; २४ तासांत तापमानात मोठी तफावत

March 4, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page