जळगाव । जालन्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीमार घटनेचे पडसाद राज्यभरात उमटत असून सरकारविरोधात निर्देशने केली जात आहे. यावरून राज्याचं राजकीय वातावरण देखील चांगलंच तापलं आहे. राज्याचे गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पत्रकारपरिषदेत घेत घडलेल्या घटनेबाबत मराठा आंदोलकांची माफी देखील मागितली. यावरून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी टोला लगावला आहे.
देवेंद्र फडणवीसांची माफी एक प्रकारे लाठीमाराचे आदेश दिल्याची कबुलीच आहे, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. ते जळगावमध्ये बोलत होते. शरद पवार यांची आज जळगावमध्ये जंगी सभा होणार आहे. या सभेसाठी शरद पवार जळगावमध्ये दाखल झाले आहेत. दरम्यान, जळगामध्ये दाखल होताच त्यांनी पत्रकारपरिषद घेतली. यावेळी त्यांनी महायुती सरकारला चांगलंच धारेवर धरलं.
आरक्षणाची मर्यादा ५० टक्के वाढवण्याची गरज आहे. मराठ्यांना ओबीसी कोट्यातून आरक्षण देणं योग्य नाही. असं शरद पवार पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले आहेत. जालन्यात झालेल्या लाठीचार्जवर देवेंद्र फडणवीसांनी माफी मागणं म्हणजे एकप्रकारे लाठीचार्जचा आदेश दिल्याची कबुलीच असल्याचं पवार यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आम्हा तिघांपैकी एकाने जरी गोळाबाराचे आदेश दिले असतील तर राजकारण सोडतो. पण तसं घडलं नसेल तर त्यांनी राजकारण सोडावं, असं थेट चॅलेंज विरोधकांना दिलं होतं.
त्याला शरद पवार यांनी उत्तर दिलं. मला इतकं माहिती आहे की जालन्यात संध्याकाळच्या सुमारास हल्ला झाला. तिथं पोलिसांनी हल्ला केलाय हे उघडपणे दिसतं. याची चौकशी सरकारने करावी. याचे अधिकार सरकारला आहेत. आम्हाला ते अधिकार नाहीत, असं शरद पवार म्हणाले.
Discussion about this post