मुंबई । येत्या दोन तीन महिन्यात राज्यातील विधानसभा निवडणूक होणार याच पार्श्वभूमीवर मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहे. यातच एक मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ हे शरद पवारांच्या भेटीसाठी दाखल झाले आहे. या भेटीचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे.
शरद पवारांचे निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओकवर ही भेट होणार आहे. या भेटीचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. मात्र छगन भुजबळ आणि शरद पवार यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
“सध्या अनेक सामाजिक घडामोडी घडत आहे. त्यामुळे विकासात्मक, सामाजिक अशा चर्चा असतात. ज्यात राज्यात काही राजकारण सुरु असते, त्यात कधी ना कधी तरी विरोधी पक्ष किंवा सत्ताधारी पक्ष भेटत असतात. त्यामुळे भुजबळ आणि पवार ही भेट कशाबद्दल आहे, हे ते या भेटीनंतर सांगतील. छगन भुजबळ हे महायुतीचे अत्यंत महत्त्वाचे नेते आहेत. त्यांचा राजकीय प्रवास मला माहिती आहे, त्यामुळे ते महायुतीला धक्का बसेल, असा कोणताही निर्णय घेणार नाही, याची मला खात्री आहे.
त्या उलट ते महायुती कशी एकत्र राहिल याचा प्रयत्न नेहमी करतात. शरद पवारांना मी देखील अनकेदा भेटलो आहे, त्यामुळे काही बाबतीत वरिष्ठांचे मार्गदर्शन घ्यावे लागते. त्यामुळे या भेटीत काहीही राजकीय घडामोड नाही”, अशी प्रतिक्रिया भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली
Discussion about this post