जळगाव । देशात लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळी सुरु आहे. यातच जळगाव जिल्ह्यातील दोन लोकसभा मतदार संघात सध्या लढाई हातघाईला आली आहे. पक्षातंर्गत नाराजीचे सावट आहे. तर प्रतिस्पर्ध्याशी सामना सुरु आहे. अशात जळगावच्या विमानतळावर एक असा प्रसंग घडला त्याने तुम्हाला नक्कीच सूखद धक्का देईल.
नेमकं काय आहे?
जळगाव लोकसभेच्या भाजपच्या उमेदवार स्मिता वाघ या भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा हे जळगाव विमानतळावर येत असल्याने त्यांच्या स्वागतासाठी आल्या होत्या. विमानतळावर प्रवेश करताना त्यांची शरद पवार यांच्याशी भेट झाली. शरद पवार आज जळगाव दौऱ्यावर आहेत. नाराजी नाट्य संपविण्यासाठी ते दाखल झाले. त्याचवेळी स्मिता वाघ यांच्याशी त्यांची भेट झाली. शरद पवार यांच्याशी भेट झाल्यानंतर स्मिता वाघ यांनी शरद पवार यांच्या पायाला नमस्कार केला आणि आशीर्वाद घेतला.
विरोधात असले तरी शरद पवार हे ज्येष्ठ राजकीय नेते आहेत. त्यामुळे पितासामान असल्याने त्यांचे आशीर्वाद घेतल्याचं स्मिता वाघ यांनी स्पष्टीकरण दिले. त्यांच्या आशीर्वादाचा मला फायदा होतो का नाही हे कळेलच. यावेळी पक्षाने विश्वास ठेवून उमेदवारी दिल्याने भाजपचे अध्यक्ष जे.पी नड्डा यांना धन्यवाद देण्यासाठी स्मिता वाघ जळगाव विमानतळावर आल्या होत्या.















Discussion about this post