अमळनेर । अमळनेर येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील व महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार हे १६ जून रोजी येत आहेत.महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी ग्रंथालय विभागाचे प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील यांनी महाराष्ट्र प्रदेश ग्रंथालय विभागाच्या एक दिवसीय शिबिराचे आयोजन अमळनेर येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात आयोजित केले आहे. त्यानिमित्ताने ते अमळनेर येथे येत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यभरातील अनेक नेते अनेक विभागांचे अध्यक्ष व महाराष्ट्रातील ग्रंथालय विभागाचे जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी या शिबिराला हजर राहणार आहेत.
दिवसभर शिबिरार्थींसाठी विविध वक्त्यांची महत्त्वपूर्ण मार्गदर्शन इत्यादी कार्यक्रम आयोजित केले आहेत. दरम्यान, मुंबईत माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली जळगाव जिल्ह्यातील लोकसभा उमेदवारांबाबत चर्चा करण्यात आली. त्यावेळी या कार्यक्रमावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
Discussion about this post