फँड्री या चित्रपटातून नावारूपाला आलेली अभिनेत्री राजेश्वरी खरात ही सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत धुमाकूळ घालत असते. नुकताच तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होऊ लागला आहे.
राजेश्वरी खरात ही आपल्या इंस्टाग्राम अंकाउंटवर ती दैनंदीन जीवनातील फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. अशातच तिने आपल्या अधिकृत इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात ती निळ्या रंगाच्या वनपीसमध्ये धम्माल डान्स करताना दिसून येत आहे. या व्हिडिओमध्ये तिने ‘डॅडी यांकी’ या गाण्यावर ठुमके लावले आहेत.
राजेश्वरी खरातचे इंस्टाग्रामवर ३ लाख ५९ हजार इतके फॉलोवर्स आहेत. राजेश्वरी खरातने २०१३ मध्ये रिलीज करण्यात आलेल्या फँड्री या चित्रपटातून पदार्पण केले. या चित्रपटात तिला शालू हे पात्र करण्याची संधी मिळाली होती.
अत्यंत साधी आणि गावाकडची मुलगी अशी ही भुमिका होती. राजेश्वरी खरातने शालू या भूमिकेला योग्य न्याय दिला होता.या चित्रपटानंतर तिचा फॅन बेस प्रचंड वाढला.
Discussion about this post