भुसावळ । एकीकडे सणासुदीचे दिवस जवळ यऊ लागले आहे. त्यात रेल्वे प्रशासनाकडून तांत्रिक कारणांमुळे रेल्वे गाड्या रद्द केल्या जात असल्याने प्रवाशांची हिरमोड होत आहे. अशातच रेल्वे प्रवाशांना आणखी एक झटका दिला आहे. दक्षिण पूर्व मध्य रेल्वे विभागातील रेल्वे रूळ दुरूस्ती, इंटरलाँकींगच्या कामासाठी काही एक्स्प्रेस आणि मेल, पँसेंजर गाड्या रेल्वे विभागाने रद्द केल्या आहेत. यामध्ये शालीमार एक्सप्रेसचा समावेश आहे.
भुसावळवरून जाणाऱ्या शालीमार एलटीटी एक्स्प्रेस (लोकमान्य टिळक टर्मिनस) आणि एलटीटी शालीमार एक्स्प्रेस ही 17 ऑक्टोबरपर्यंत रद्द करण्यात आली आहे.
ऐन सणासुदीच्या काळात गाड्या रद्द झाल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहेत. दरम्यान रेल्वे रूळ दुरूस्ती व अन्य कारणांसाठी रेल्वे विभागास काम करायचे असल्याने रेल्वे गाड्या रद्द केल्या आहेत. तरी प्रवाशांनी रेल्वे प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन रेल्वे विभागाने केले आहे.















Discussion about this post