जामनेर । तालुक्यातील शहापूर येथे तरुणाने अनैतिक संबंध ठेवलेल्या महिलेशी वाद झाल्यानंतर तिच्या डोक्यात दगड घालून तिची अत्यंत निघृण हत्या केली. या महिले सोबत आरोपी तरुणाचे अनेक महिन्यांपासून अनैतिक संबंध होते. आरोपीने हत्या करुन शहरातून पळून जाण्याच्या बेतात असतानाच त्याला अटक करण्यात आली आहे.घडलेल्या या प्रकारामुळे खळबळ उडाली होती.या प्रकरणातील मृत महिलेचे नाव संगीता पिराजी शिंदे असे आहे.
याबाबत असे की, शहापूर पुरा येथे राहणारी 36 वर्षीय महिला संगीता शिंदे हीच्या पतीचं काही वर्षांपूर्वी निधन झाले होते. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. ही महिला सध्या एकटी राहत असून तिचे लहान्या ऊर्फ किरण कोळी याच्याशी अनैतिक संबंध सुरू होते. मात्र सोमवारी सकाळी दोघांमध्ये वाद झाला आणि त्यानंतर मयत महिला आरोपीच्या आईला शिवीगाळ करू लागली.
त्यामुळे चिडलेल्या प्रियकराने लाकडी काठीने तिच्यावर हल्ला केला. त्यानंतर तिच्या डोक्यात दगडाने वार करीत तिची त्याने हत्या केली. हत्या केल्यानंतर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला. घटनेची माहिती स्थानिक नागरिकांकडून पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी आरोपी किरण कोळी याला अटक केल्याचे जामनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी सांगितले.
Discussion about this post