नंदूरबार । जिल्ह्यातील शहादा शहरातील प्रकाशा रस्त्यावरील दुकानांना भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या रस्त्यावरील आठ ते नऊ दुकानांना भीषण आग लागली असून यामध्ये चारचाकी वाहनांचे गॅरेज, मंडप साहित्यांची दुकाने, इलेक्ट्रिक दुकान, साऊंड सिस्टम आणि इतर अनेक दुकानांना भीषण आग लागल्याची माहितची मिळाली आहे.
Nandurbar, Maharashtra: A massive fire beaks out on Prakasha Road in Shahada, engulfing 8-9 shops, including a car repair garage, electrical store, and mandap material shop. Firefighters are working to control the blaze. Estimated losses range between ₹50-60 lakh, with vehicles… pic.twitter.com/DbciWLjZEq
— IANS (@ians_india) February 10, 2025
घटनास्थळी शहादा नगरपालिका अग्निशामन दल दाखल झाले आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशामक दलाचे शर्तीचे प्रयत्न सुरु आहेत. भीषण आगीत 50 ते 60 लाख रुपयांचं नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जातेय. भीषण आगीत मोठा ट्रक जळून खाक झाला आहे. तसेच इतर लहान मोठे चारचाकी वाहनं देखील जळाल्याची माहिती मिळाली आहे. ही आग नेमकी कशामुळं लागली हे अद्यापही अस्पष्ट आहे.
Discussion about this post