जळगाव । राज्यात पुन्हा एकदा कडाक्याचं ऊन पडायला सुरूवात झाली आहे. महाराष्ट्रात तीव्र उष्णतेची लाट येणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. राज्यातील जळगावसह अनेक जिल्ह्यातील तापमान 42 अंशावर गेले आहे. यामुळे उष्णतेच्या झळा प्रचंड जाणवत आहे. दरम्यान पुढील दोन दिवस आणखी तापमान वाढण्याची शक्यता असून राज्यातील अनेक ठिकाणी उष्णतेचा इशारा देण्यात आला आहे.
हवमान विभागाने विदर्भासह अनेक भागात उष्णतेचा यलो अलर्ट दिला आहे. राज्यात एकीकडे उष्णतेचा इशारा दिला असतानाच काही ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा अन् लातूरमध्ये अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
एप्रिल उजाडताच राज्यातील कमाल तापमानात दिवसेंदिवस वाढ होत आहे. पार्याने चाळीशी पार केल्याने मे महिन्यातील उन्हाच्या स्थितीचा विचार करुन नागरिकांच्या अंगावर काटा येत आहे. दिवसेंदिवस उष्णता वाढत असल्याने घामाच्या धारांनी नागरिक असह्य केले आहे.
या जिल्ह्यांना अलर्ट
दरम्यान हवामान खात्याने राज्यातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नंदुरबार, जळगाव, धुळे, अकोला, चंद्रपुर, गडचिरोली, नागपूर, यवतमाळ या जिल्ह्यांना उष्णतेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
Discussion about this post