भुसावळ । छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे प्लॅटफॉर्म क्रमांक १० व ११ च्या विस्ताराचे काम सुरू आहे. यामुळे रेल्वे प्रशासनाने २ जूनपर्यंत विशेष ब्लॉक घेतला, याच काळात पाच रेल्वे गाड्या रद्द केल्या आहे. त्या भुसावळ विभागातून जात नाही.
हा ब्लॉक ३० व ३१ मे रोजी रात्री १२.३० ते पहाटे ४.३० पर्यंत चार तासांचा आहे. त्यात १३ गाड्या शॉर्ट टर्मिनेट केल्या आहेत. यापैकी ७ गाड्या भुसावळ विभागातून धावतात. १२५३३ लखनौ सीएसएमटी पुष्पक एक्सप्रेस २९ ते २९ मेपर्यंत, ११०५८ अमृतसर मुंबई एक्स्प्रेस २९ ते २९ मेपर्यंत, ११०२० भुवनेश्वर मुंबई कोणार्क एक्स्प्रेस २८ ते २९ मे, १२८१० हावडा- मुंबई मेल २१ ते २९ मे पर्यंत, २२२२४ साईनगर शिर्डी सीएसएमटी वंदे भारत एक्सप्रेस २२ ते ३० मे पर्यंत (२८ मे वगळता), १२८७० हावड़ा सीएसएमटी सुपरफास्ट २४ मेपर्यंत, तर १२११२ अमरावती – सीएसएमटी एक्स्प्रेस २७ ते ३० मेपर्यंत ठाण्यात शॉर्टटर्मिनेट केली आहे,
पाच गाड्या दादरहून
ब्लॉकच्या काळात एकूण पाच गाड्या दादर स्थानकाहून सुटतील. त्यात भुसावळातून धावणाऱ्या अनुक्रमे १९०५७ मुंबई – अमृतसर एक्सप्रेस (२२ से ३० मे पर्यंत), २२१७७ मुंबई-वाराणसी महानगरी २३ ते ३१ मेपर्यंत दादरहून सुटेल
Discussion about this post