Tuesday, February 24, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राष्ट्रीय

हवाई प्रवासाला हादरवणारी घटना ! एअर ॲम्बुलन्स विमान कोसळल्याने सात जण ठार

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
February 24, 2026
in राष्ट्रीय
0
हवाई प्रवासाला हादरवणारी घटना ! एअर ॲम्बुलन्स विमान कोसळल्याने सात जण ठार
बातमी शेअर करा..!

देशात विमान अपघाताच्या घटना वाढताना दिसत असून काही दिवसापूर्वी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्याने देशात खळबळ उडाली. यानंतर आता पुन्हा विमान अपघाताची भीषण घटना समोर आलीय. झारखंडमधील रांचीहून दिल्लीकडे निघालेले एअर मेडिकल ॲम्बुलन्स विमान अचानक कोसळल्याने सात जणांचा मृत्यू झाला.

बिरसा मुंडा एअरपोर्ट येथून उड्डाण घेतलेल्या या विमान अपघातामुळे परिसरात शोककळा पसरली आहे. रुग्णाला उपचारासाठी नेत असताना घडलेल्या या घटनेने हवाई वैद्यकीय सेवांच्या सुरक्षिततेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. प्रशासन तपास करत आहे.

हे विमान झारखंडमधील चतरा आणि लातेहार जिल्ह्याच्या सीमाभागात कोसळले. उड्डाण केल्यानंतर अवघ्या 23 मिनिटांत विमानाचा संपर्क तुटला. अधिकृत माहितीनुसार, रेडबर्ड एअरवेजचे बीचक्राफ्ट C90 (VT-AJV) हे विमान सायंकाळी 7:11 वाजता Birsa Munda Airport येथून दिल्लीसाठी रवाना झाले होते. उड्डाणानंतर सुमारे 7:34 वाजता विमानाचा कोलकाता एटीसीशी संपर्क तुटला. रडारवरून गायब होताना विमान वाराणसीच्या सुमारे 100 नॉटिकल मैल आग्नेय दिशेला असल्याचे सांगण्यात आले.

दुकानातील शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत जखमी झालेल्या संजय कुमार यांना रांचीतील रुग्णालयात उपचार सुरू होते. अधिक चांगल्या उपचारांसाठी त्यांना दिल्लीला रेफर करण्यात आले होते. रुग्णाच्या कुटुंबीयांनी सुमारे साडेसात लाख रुपये खर्च करून एअर ॲम्बुलन्स बुक केली होती. मात्र रुग्णासह विमानातील दोन पायलट आणि डॉक्टर यांचाही या अपघातात मृत्यू झाला.

अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. प्रशासनाकडून तपास सुरू असून तांत्रिक बिघाड, हवामान किंवा इतर कारणांचा शोध घेतला जात आहे. या घटनेनंतर विमान वाहतूक सुरक्षेबाबत पुन्हा प्रश्न उपस्थित झाले आहेत. हवामान आणि उड्डाण स्थितीचा आढावा घेऊन तपास केला जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

बातमी शेअर करा..!
Previous Post

गावाचा विकास सरपंचांच्या बांधिलकीवर अवलंबून – रक्षा खडसे

Next Post

केंद्र सरकारच्या नव्या निर्णयाने कांदा उत्पादकांवर नवा घाव! दरांवर दबाव वाढणार

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी ; आता केंद्र सरकारने घेतला हा मोठा निर्णय

केंद्र सरकारच्या नव्या निर्णयाने कांदा उत्पादकांवर नवा घाव! दरांवर दबाव वाढणार

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
खडसे नावामुळे मला डावलण्याचा प्रयत्न करत असाल तर.. खा. रक्षा खडसेंनी व्यक्त केली नाराजी

रक्षा खडसेंच्या संतापाचा स्फोट! वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना घेतलं फैलावर

February 24, 2026
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी ; आता केंद्र सरकारने घेतला हा मोठा निर्णय

केंद्र सरकारच्या नव्या निर्णयाने कांदा उत्पादकांवर नवा घाव! दरांवर दबाव वाढणार

February 24, 2026
हवाई प्रवासाला हादरवणारी घटना ! एअर ॲम्बुलन्स विमान कोसळल्याने सात जण ठार

हवाई प्रवासाला हादरवणारी घटना ! एअर ॲम्बुलन्स विमान कोसळल्याने सात जण ठार

February 24, 2026
गावाचा विकास सरपंचांच्या बांधिलकीवर अवलंबून – रक्षा खडसे

गावाचा विकास सरपंचांच्या बांधिलकीवर अवलंबून – रक्षा खडसे

February 24, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page