पुणे । राज्यात प्राध्यापक भरतीसाठी अनिवार्य असलेल्या सेट परीक्षेचा निकाल सोमवारी (५ ऑगस्ट) जाहीर झाला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने घेतलेल्या सहाय्यक प्राध्यापक पदासाठीच्या पात्रता परीक्षेचा (सेट) निकालात ७ हजार २७३ उमेदवार उत्तीर्ण झाले असून ते आता सहायक प्राध्यापक पदासाठी अर्ज करण्यास पात्र ठरले आहे. एकूण निकालाची टक्केवारी ही ६.६६ टक्के लागली आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील सेट विभागाच्या वतीने ७ एप्रिल रोजी १७ शहरांमधील विविध महाविद्यालयात ३९ व्या सेट परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. या परीक्षेत महाराष्ट्र आणि गोव्यातील १ लाख ९ हजार २५० विद्यार्थी सहभागी झाले होते. सेट विभागातर्फे या परीक्षेची अंतिम उत्तरतालीका विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच उत्तीर्ण विद्यार्थ्यांना लगेचच त्यांचे सेट प्रमाणपत्र वरील संकेतस्थळावरून डाऊनलोड करता येणार आहे.
सेट परीक्षेचा निकाल जाहीर करताना त्यासाठी मराठा आरक्षण लागू करावी किंवा करू नये, याबाबत विद्यापीठातर्फे शासन स्तरावर विद्यापीठाकडून पाठपुरावा केला जात होता. मात्र, त्याचे उत्तर प्राप्त होण्यास उशीर झाला.त्यामुळे सेट परीक्षेचा निकाल जाहीर करण्यास विलंब झाला.
Discussion about this post