वर्धा । वर्ध्यातून भाजपाने रामदास तडस तिसऱ्यांदा उमेदवारी जाहीर केली असून मात्र रामदास तडस यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण रामदास तडस यांची सून पूजा तडस यांनी आज पत्रकार परिषद घेऊन गंभीर आरोप केले आहेत. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्यासोबत त्यांनी पत्रकार परिषद घेतली. “मला फ्लॅटवर नेऊन टाकलं. उपभोगण्याची वस्तू म्हणून माझा तिथे वापर झाला. त्यातून या बाळाचा जन्म झाला. बाळा जन्मल्यानंतर डीएनए कर म्हणून आरोप झाले” असं दु:ख पूजा तडस यांनी मांडलं.
“स्वत:च्या मुलाला बलात्काराच्या आरोपातून वाचवण्यासाठी माझ्याशी लग्न लावून दिलं. मला फ्लॅटवर नेऊन टाकलं. उपभोगण्याची वस्तू म्हणून माझा तिथे वापर झाला. त्यातून या बाळाचा जन्म झाला. बाळा जन्मल्यानंतर डीएनए कर म्हणून आरोप झाले” असं दु:ख पूजा तडस यांनी मांडलं. “खासदार म्हणतात डीएनए टेस्ट कर, तेव्हा समाजातल्या माझ्यासारख्या मुलींनी जायच कुठे? प्रत्येकवेळी अपमानास्पद वागणूक दिली. घरी गेली, तेव्हा लोखंडी रॉडने मारहाण केली. फ्लॅट विकला. मुलाला बेदखल केलं म्हणता, मग त्याला घरात का ठेवलय?” असा सवाल पूजा तडसने केला.
दरम्यान, यावरून सुषमा अंधारे यांनी मोदी यांच्यावर जोरदार निशाणा साधला. “कारवाई टाळण्यासाठी म्हणून रामदास तडस यांच्या मुलाने पूजा तडसशी विवाह केला. पुढे त्या मुलीच काय झालं? मोदीच्या उमेदवाराने, मोदीजींचा परिवार संभाळला का? कारवाईच्या भीतीने फक्त लग्न केलं. पत्नीला फ्लॅटवर नेऊन ठेवलं. पुढे तिची काय अवस्था झाली, ते पाहिलं नाही. तो फ्लॅट विकला, तिला बाहेर काढलं” असा आरोप सुषमा अंधारे यांनी केला.
“लग्न करुन जे आपला परिवार सोडून देतात, ते मोदी का परिवार म्हणून हॅशटॅग लावतात, हे फार चमत्कारिक, भयंकर आहे. देवाभाऊंच्या हद्दीत अशा घटना घडाव्यात हे विशेष” अशा शब्दात सुषमा अंधारे यांनी टीका केली. “पूजा तडसला ज्या घरात ठेवलं होतं, ते विकलं. न्याय मागण्यासाठी तडस यांच्या जनसंपर्क कार्यालयात महिला गेली, तिथेही अपमान केला. ओढून बाहेर काढण्यात आलं” असा आरोप सुषमा अंधारे यांनी केला. “मोदींचा परिवार म्हणता आणि हा परिवार उद्धवस्त होतो. हा कसला मोदींचा परिवार?” अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली.