पुणे । जून महिन्या सरासरीपेक्षा कमी पाऊस, त्यानंतर जुलै महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याने जून महिन्याची पावसाची कमतरता भरुन निघाली. मात्र ऑगस्ट महिना संपूर्ण कोरडा गेल्याने राज्यावर दुष्काळाचं सावट आहे. राज्यात ऑगस्टच्या सुरुवातीपासूनच पावसाने विश्रांती घेतली.
पावसाअभावी उभी पिकं करपली तर येत्या काळात पाऊस पडला नाहीतर अनेक भागात पाणीटंचाईलाही सामोरं जावं लागू शकतं आता सप्टेंबर महिन्यात पावसाचं प्रमाण कसं असेल याकडे शेतकऱ्यांसह अवघ्या राज्याचं लक्ष लागलं आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, सप्टेंबर महिन्यात काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. सप्टेंबरमध्ये येणार्या 4 आठवड्यांसाठी हवामान विभागाने अंदाज जारी केला आहे.
सप्टेंबर महिन्यात पहिल्या आठवड्यामध्ये पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. तर सप्टेंबरमध्ये मध्यापर्यंत चांगला पाऊस पडू शकतो, असा अंदाज आहे. दक्षिण द्वीपकल्प, महाराष्ट्रात मराठवाडा, कोकण, गोवा यासह मध्य भारतातील काही भागांत पावसाच्या चांगल्या पुनरागमनाची शक्यता आहे.
ऑगस्टमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस
ऑगस्टमध्ये राज्यात सरासरीपेक्षा ५८ टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये ७० ते ८६ टक्क्यांपेक्षा कमी झाला. एकाही जिल्ह्याची पावसाची सरासरी ५० टक्क्यांपेक्षा जास्त नाही. त्यामुळे सप्टेंबर महिन्यात पाऊस सुरु होईल आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळेल ही अपेक्षा आहे.
Discussion about this post