मुंबई । काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात त्यांचा मुलगा आणि माजी आमदार झिशान सिद्दीकी यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. ज्यामुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.
झिशान सिद्दिकीने पोलिसांना दिलेल्या जबाबात १० बिल्डर्स आणि भाजप नेते मोहित कंबोजचं नावं घेतल्याची माहिती टाईम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्राने दिली आहे. हत्येच्या दिवशी वडिलांनी लिहिलेल्या डायरीत मोहित कंबोज यांचं नाव असल्याचा उल्लेख झिशान सिद्दिकींनी केला आहे.
झिशान सिद्दिकी यांनी मोनज कंबोज यांच्यावर आरोप केले नाहीत. मात्र बाबा सिद्दिकी यांनी ज्यांच्यासोबत शेवटच्या गप्पा मारल्या ते मोहित कंबोज असल्याचे झिशान यांनी म्हटलं आहे. झिशान सिद्दिकींनी केलेल्या आरोपात मुंद्रा बिल्डर्स, पृथ्वी चव्हाण, शाहिद बलवा, शिवालिक व्हेंचर्स, अदानी, नबील पटेल, विनोद गोएंका आणि ओंकार बिल्डर्स या नामांकित बिल्डर्सच्या नावांचा उल्लेख केला आहे.
एसआरए प्रकल्पात नागरिकांची बाजू घेतल्यानेच हत्या झाल्याचा दावाही झिशान सिद्दिकीने केल्याची माहिती टाईम्स ऑफ इंडियाने दिली आहे. तर दुसरीकडे बाबा सिद्दिकींची हत्या बिष्णोई गँगनेच केली या दाव्यावर मुंबई पोलिस ठाम आहेत. पोलिसांकडून या हत्या प्रकरणाचा कसून तपास सुरू आहे.















Discussion about this post