मुंबई । शिवसेना उद्धव ठाकरेंना गेल्या काही दिवसांपासून धक्क्यांवर धक्के बसत होते. कोकणापासून राज्यातील अनेक ठिकाणी नेते अन् कार्यकर्त्यांनी त्यांची साथ सोडली. परंतु यातच उद्धव ठाकरेंना दिलासा मिळालाय. तो म्हणजे कोकणातील काँग्रेसच्या बड्या नेत्याने कार्यकर्त्यांसह उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. सहदेव बेटकर यांनी आज मुंबईत उद्धव ठाकरेंच्या ‘मातोश्री’ निवासस्थानी जाहीर प्रवेश केला आहे. शिवसेना सोडून ते काही काळापूर्वी काँग्रेसमध्ये गेले होते. मात्र, आता त्यांनी पुन्हा ठाकरेंचं शिवबंधन बांधलं आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील कुणबी ओबीसी समाजातील नेते सहदेव बेटकर यांनी मंगळवारी शिवबंधन बांधले. ते गेल्या काही वर्षांपासून काँग्रेसमध्ये होते. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडून लढताना त्यांनी ५२ हजार मते मिळवली होती. त्या निवडणुकीत ते पराभूत झाले होते. पराभवानंतर ते सक्रीय नव्हते. विधानसभा निवडणुकीच्या पराभवानंतर ते गुहागरमध्ये फारसे दिसले नाहीत. आता शिवसेना उबाठात येऊन ते पुन्हा सक्रीय झाले आहे.
निवडणुकीपूर्वी जिल्हा परिषद सदस्य, सभापती म्हणून ते सक्रीय होते. पण पराभूत झाल्यानंतर सहदेव बेटकर जास्त सक्रीय नव्हते.आता त्यांनी ठाकरे करून प्रवेश करून सक्रिय होण्याचं निश्चित केलं आहे.
Discussion about this post