जळगांव – येथील स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान आणि भवरलाल अँड कांताबाई फाउंडेशनच्या सहकार्याने “सांज पाडवा” या सांगितिक मैफिलीचे आयोजन भाऊंच्या उद्यानात करण्यातआले होते. जळगावच्या कलावंतांनी हा कार्यक्रम सादर केला..
या कार्यक्रमाचे उदघाटन कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे सेवानिवृत्त उपकुलसचिव विकास तळेले यांच्या हस्ते झाले. यावेळी विद्यापीठाच्या व्यवस्थापनशास्त्र प्रशाळेच्या संचालिका डॉ. मधुलिका सोनवणे या उपस्थित होत्या.
यावेळी अथर्व मुंडले,वरुण नेवे,श्रुती जोशी ,ऐश्वर्या परदेशी या कलावंतांनी विविध रागातील गाणी सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.या गायक कलावंतांना प्रसन्न भुरे (तबला) राजेंद्र माने (संवादिनी) शुभम कुलकर्णी (मंजिरी) यांनी साथसंगत केली.तर अनघा गोडबोले यांनी निरूपण केले.
प्रतिष्ठानच्या परंपरेप्रमाणे गुरुवंदना दीपक चांदोरकर यांनी सादर केली. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत अध्यक्ष डॉ. विवेकानंद कुलकर्णी व उपाध्यक्षा दीपिका चांदोरकर यांनी केले. यावेळी कलावंतांचा सत्कार डॉ.विवेकानंद कुलकर्णी, अरविंद देशपांडे, व दीपिका चांदोरकर यांनी केला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नुपूर खटावकर यांनी केले.















Discussion about this post