मुंबई । सोनं खरेदीदारांसाठी खूशखूबर असून सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. ज्यामुळे नवरात्रोत्सवाच्या मुहूर्तावर सोने खरेदीचा प्लॅन करणाऱ्या ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. आज २४ कॅरेट १ तोळं सोन्याच्या दरात ९३० रूपयांची घसरण झाली आहे. तर चांदीचा दर स्थिर आहे.
आज २५ सप्टेंबर सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याच्या दरात ९३० रूपयांची घसरण होऊन १,१४,४४० रुपयांवर पोहोचले आहे २४ सह २२ कॅरेट सोन्याच्या दरातही घसरण पाहायला मिळत आहे. २२ कॅरेट १० ग्रॅम सोन्याच्या दरात ८५० रूपयांची घसरण झाली आहे. २२ कॅरेट १ तोळं सोनं खरेदीसाठी आपल्याला १,०४,९०० रूपये मोजावे लागतील.
सोन्याच्या दरात घसरण जरी झाली असली तरी, चांदीचा दर जैसे थे आहे. चांदीच्या दरात कोणतेही बदल झाले नाही. १ किलो चांदी खरेदीसाठी आपल्याला १,४०,००० रूपये मोजावे लागतील.















Discussion about this post