मुंबई । राज्यात होऊ घातलेल्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा कधी होणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागले. मात्र त्यापूर्वी वंचित बहुजन आघाडीने आपल्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली.
वंचित बहुजन आघाडीचे आज विधानसभा निवडणुकीसाठी १० उमेदवाराची दुसरी यादी जाहीर केली. मलकापूर, बाळापूर, परभणी, संभाजीनगर मध्य, गंगापूर, कल्याण पश्चिम, हडपसर, माढ, शिरुळ आणि सांगली या विधानसभा मतदारसंघासाठी वंचितने उमेदवारांची नावं जाहीर केली आहे. सर्व उमेदवार मुस्लिम समाजाचे आहेत. काँग्रेसचे माजी विधानपरिषद आमदार खातिव सैय्यद नातिकुद्दिन यांनी काँग्रेस पक्षाच्या सदस्य पदाचा राजीनामा देऊन बाळासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीत वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला. बाळापूर जिल्हा अकोला विधानसभा मतदारसंघातून त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
वंचित बहुजन आघाडीची दुसरी उमेदवार यादी –
– मलकापूर – शहजाद खान सलीम खान
– बाळापूर – खातिब सय्यद नतीकउद्दीन
– परभणी – सय्यद सलीम सय्यद साहेबजान
– संभाजीनगर मध्य – मोहम्मद जावेद मोहम्मद इसाक
– गंगापूर – सय्यद गुलाम नबी सय्यद
– कल्याण पश्चिम – अयाझ गुलजार मोहवी
– हडपसर – मोहम्मद अफरोज मुल्ला
– माढ – इमतियाज जफर नडाफ
– शिरुळ – अरीफ मोहम्मअली पटेल
– सांगली – अल्लाउद्दीन ह्यातचंद काझी
Discussion about this post