मुंबई । राज्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे महाराष्ट्र राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडून शैक्षणिक वर्ष 2025 – 26 मधील सुट्ट्यांची यादी जाहीर करण्यात आलीय. त्यानुसार शाळा तथा विद्यार्थ्यांना ५२ रविवार वगळून वर्षभरात एकूण ७६ सुट्या असणार आहेत. त्यात दीवाळीच्या १० दिवस (१६ ते २७ ऑक्टोबरपर्यंत) आणि उन्हाळ्याच्या ३८ दिवस (२ मे ते १३ जूनपर्यंत) सुट्या असणार आहेत.
जिल्हा परिषदेच्या शाळांची नियमित वेळ सकाळी साडेदहा ते सायंकाळी पाच अशी असणार आहे. अर्ध्यावेळेची शाळा सकाळी नऊ ते दुपारी दीड वाजेपर्यंत भरेल, असेही शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. शाळेच्या कामकाजादिवशी ६० मिनिटांची मोठी सुटी तर पहिल्या व दुसऱ्या सत्रात १० मिनिटांच्या दोन सुट्या राहतील. दुबार पद्धतीने शाळा भरत असल्यास दहा मिनिटांची लहान आणि ३५ मिनिटांची मोठी सुटी असणार आहे.
वर्षभरातील सार्वजनिक सुट्या
जुलै : आषाढी एकदाशी, मोहरम, नागपंचमी (२ दिवस)
ऑगस्ट : रक्षाबंधन, स्वातंत्र्य दिन, गणेश चतुर्थी (३ दिवस)
सप्टेंबर : गौरी विसर्जन, ईद-ए- मिलाद, अनंत चतुर्दशी, घटस्थापना (४ दिवस)
ऑक्टोबर : गांधी जयंती (दसरा) व दिवाळी सुटी (११ दिवस)
नोव्हेंबर : गुरूनानक जयंती (१ दिवस)
डिसेंबर : ख्रिसमस- नाताळ (१ दिवस)
जानेवारी : मकरसंक्रांती, शबे- ए- मेराज, प्रजासत्ताक दिन (३ दिवस)
फेब्रुवारी : शब-ए-बरात, महाशिवरात्री, श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती (३ दिवस)
मार्च : धुलिवंदन, रंगपंचमी, शब-ए-कदर, गुढी पाडवा, रमजान ईद, रामनवमी, महावीर जयंती (६ दिवस)
एप्रिल : गुड फ्रायडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती (२ दिवस)
मे : महाराष्ट्र दिन, उन्हाळा सुटी (२७ दिवस)
जून : उन्हाळा सुटी : (१२ दिवस)
जिल्हाधिकारी व मुख्याध्यापक अधिकारातील सुटी : (२ दिवस)
Discussion about this post