राजस्थानमधील जयपूरमध्ये ४० मुलांना घेऊन जाणारी स्कूल बस उलटली. चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे बस अचानक उलटली झाल्याने या दुर्दैवी अपघातामध्ये एका शाळकरी मुलाचा मृत्यू झाला. तर अनेकजण जखमी झाले आहेत. जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याचे समजतेय. अपघातानंतर संतप्त जमावाने रस्त्यावर आंदोलन केलेय.
मिळालेल्या माहितीनुसार, जयपूरमधील चौमू येथील वीर हनुमान मार्गावर ब्रिजच्या जवळ हा अपघात झाला. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्यामुळे स्कूल बस पूलावरून खाली कोसळली. या अपघातामध्ये एक मुलगी स्कूल बसच्या खाली गेली, त्यामध्ये त्या मुलीचा मृत्यू झाला. या अपघातामध्ये अनेक शाळकरी मुलं जखमी झाले. त्यामधील काहींना जबर मार लागलाय.चौमू येथील एका खासगी शाळेतील बस होती, त्यामध्ये ४० मुलं प्रवास करत होते. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील लोकांना घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. लोकांनी बसमधूल चिमुकल्यांना बाहेर काढत रूग्णालयात दाखल केले.
स्कूल बस शाळेत जाण्यासाठी ब्रिजवरून यू टर्न घेत होती. पण वेग जास्त असल्यामुळे नियंत्रण गेलं अन् खाली कोसळली. अपघाताची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली. अपघतस्थळाकडे धाव घेत लोकांनी तात्काळ मदतकार्य सुरूवात केले. बसच्या काचा फोडून मुलांना बाहेर काढले. जखमी झालेल्या मुलांना तात्काळ रूग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींवर सध्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
Discussion about this post