विद्यार्थ्यांना घेऊन स्कुल बस शाळेकडे जात असताना बस वरील नियंत्रण सुळ्याने बस रस्त्याच्या कडेला उलटली. या बसमध्ये 60 विद्यार्थी होते. यात सुमारे वीस विद्यार्थी जखमी झाले आहेत.जखमी विद्यार्थ्यांना गडचांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आलं.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, लालबहादूर शास्त्री विद्यालयाची बस नेहमीप्रमाणे विद्यार्थ्यांना घेऊन स्कूल शाळेकडे निघाली होती. बसमध्ये तब्बल ६० विद्यार्थी होते. दरम्यान स्कूल बस हरदोना गावानजीक आली असता चालकाचं बसवरील नियंत्रण सुटलं. चालकाला बस थांबवता आली नाही आणि काही क्षणात बस रस्त्याच्या बाजूला जावून उलटली.
या अपघात २० विद्यार्थी जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि विद्यार्थ्यांना बाहेर काढलं. जखमी विद्यार्थ्यांना गडचांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आलं. माहिती मिळताच पालकांनीही रुग्णालयात धाव घेतली आहे. विद्यार्थ्यांवर सध्या उपचार सुरू असून पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहे.















Discussion about this post