जळगाव । जळगाव तालुक्यातील अव्हाणे गावातील बारा वर्षीय मुलाचा गिरणी नदीपात्राच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. वैभव नरेंद्र पाटील असे मयत बालकाचे नाव आहे.
याबाबत असं की, आव्हाणे (ता. जळगाव) गावात कुटुंबासह वास्तव्याला असलेला वैभव पाटील ता.१७ रोजी शाळेतून परत आल्यावर दुपारी तीनला तो खेळण्यासाठी घराबाहेर पडला. सायंकाळी उशिरापर्यंत वैभव घरी न आल्यामुळे त्याचा नातेवाइकांनी शोध घेतला. परंतु रात्री उशिरापर्यंत शोध घेऊनही वैभव मिळून आला नाही. यानंतर याप्रकरणी पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद केली.
वैभव बेपत्ता झाल्याची बातमी संपूर्ण गावात पसरली. काही ग्रामस्थांनी वैभव यास गिरणा काठावरील महादेव मंदिरात खेळताना पाहिले होते. म्हणून धीरज पाटील (काका) यांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला. खेळता-खेळता तो नदी पात्रात तर गेला नसावा शंकेने बुधवारी (ता.१८) रोजी धीरज पाटील व स्वप्नील जोशी यांच्यासह गावातील काही तरुण नदीपात्रात शोध घेत असताना, दुपारी अडीचला गिरणा नदीपात्राच्या वरच्या भागातील पात्रात वैभवचा मृतदेह तरंगताना आढळून आला.
Discussion about this post