नवी दिल्ली । केंद्रीय निवडणूक आयोगाने आज पाच राज्यांमध्ये होणाऱ्या निवडणुकांची घोषणा केली आहे. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगाना आणि मिझोराम या पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.
छत्तीसगडमध्ये दोन टप्प्यात निवडणूक पार पडणार आहे. तर मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा आणि मिझोराममध्ये एका टप्प्यात निवडणूक घेतली जाणार आहे. छत्तीसगडमध्ये ७ नोव्हेंबरला पहिला टप्प्यात तर दुसऱ्या टप्प्यात १७ नोव्हेंबरला मतदान पार पडेल.
मध्य प्रदेशमध्ये १७ नोव्हेंबरला, राजस्थानमध्ये २३ नोव्हेंबरला, तेलंगणामध्ये ३० नोव्हेंबरला आणि मिझोराममध्ये ७ नोव्हेंबरला मतदान पार पडेल. तर ३ डिसेंबरला सर्व राज्यातील मतमोजणी पार पडेल.
मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, या निवडणुकीत एकूण १६.१४ कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये ८.२ कोटी पुरुष आणि ७.८ कोटी महिला मतदार असतील. यावेळी ६०.२ लाख नवीन मतदार प्रथमच मतदान करणार आहेत.
Discussion about this post