बँकेत काम करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. देशातील सर्वात मोठी बँक भारतीय स्टेट बँकेनं (SBI) ने लिपिक पदासाठी भरती जाहीर केलीय. यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले जात आहे.
तब्बल ५१८० पदांसाठी ही भरती जाहीर केली आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया आजपासून सुरु झाली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ ऑगस्ट २०२५ असणार आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी पुढच्या २० दिवसांत अर्ज करावेत.
पात्रता
अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी प्राप्त केलेली असावी.
या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची वयोमर्यादा २० ते २८ वर्षे असावी.
राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे. एससी-एसटी उमेदवारांना वयोमर्यादेत ५ वर्षांची सुट दिली आहे.
निवडप्रक्रिया
या नोकरीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची निवड परीक्षेद्वारे होणार आहे. उमेदवारांना प्रिलियम्स परीक्षा, मुख्य परीक्षा आणि स्थानिक भाषा टेस्ट द्यावी लागणार आहे.प्रिलियम्समध्ये इंग्रजी, न्युमेरिकल अॅबिलिटी आणि रिजनिंग विषय असणार आहे. या परीक्षेत पास झाल्यावरच तुम्हाला मुख्य परीक्षा देता येणार आहे.
या नोकरीसाठी अर्ज करताना तुम्हाला शुल्क भरावे लागणार आहे. सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना ७५० रुपये शुल्क भरायचे आहे तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.
जाहिरात (PDF) | Click Here |
Online अर्ज | Apply Online |
Discussion about this post