सरकारी बँकेत नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी खुशखबर आहे. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले जात आहे.
या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया १९ जुलैपासून सुरु झाली आहे. bank.sbi/careers या वेबसाइटवर जाऊन तुम्हाला या नोकरीसाठी अर्ज करता येणार आहे. नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ ऑगस्ट २०२४ आहे.
या पदांसाठी भरती होणार?
या भरतीमध्ये सेंट्रल रिसर्च टीम (प्रोजेक्ट लीड ) रेगुलर पदासाठी २ रिक्त जागा आहेत तर सेंट्रेल रिसर्च टीम (सपोर्ट)रेगुलर पदासाठी २ रिक्त जागा आहे. प्रोजेक्ट डेव्हलपमेंट मॅनेजर टेक्नोलॉजी पदासाठी १ रिक्त जागा आहे तर प्रोजेक्ट डेव्हलपमेंट मॅनेजर (बिजनेस) पदासाठी २ रिक्त पदे आहेत. तसेच रिलेशनशिप मॅनेजर, रिजनल हेड या पदांसाठीही रिक्त जागा आहेत.
या नोकरीसाठी उमेदवारांची पात्रता आणि अनुभवाच्या निकषावर मुलाखतीसाठी बोलवले जाणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करताना उमेदवारांना सर्व आवश्यक कागदपत्रे त्यात बायोडेटा, आयडी प्रुफ, वयाचा दाखला, जात प्रमाणपत्र, शैक्षणिक पात्रता ही सर्व कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे.
या नोकरीसाठी अर्ज करताना सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना ७५० रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. तर एससी, एसटी आणि दिव्यांग उमेदवारांना विनाशुल्क अर्ज करता येणार आहे.
Notification : PDF















Discussion about this post