जर तुम्हालाही बँकेत नोकरी करायची असेल तर ही माहिती खास तुमच्यासाठी. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. स्टेट बँकेत स्पेशलिस्ट ऑफिसर पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया २७ नोव्हेंबरपासून सुरु झाली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ डिसेंबर २०२४ आहे.
विशेष ग्रॅज्युएशन पूर्ण झालेल्या तरुणांसाठी ही चांगली संधी आहे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.बँकेत प्रमुख (उत्पादन, गुंतवणूक ), झोन प्रमुख पदासाठी ४ जागा रिक्त आहेत. रिजन हेडसाठी १० पदे रिक्त आहेत. टीम लीडसाठी ९ पदे रिक्त आहेत.सेंट्रल रिसर्च टीम या पदासाठीही ही भरती केली जाणार आहे. (SBI SCO Job Recruitment)
स्टेट बँकेत स्पेशलिस्ट ऑफिसर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन केले असावे. सेंट्रल रिसर्च टीम पदासाठी उमेदवाराने CA/CFA मधून अर्थशास्त्र, वाणिज्य, वित्त, व्यवसाय प्रशासनमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन पदवी प्राप्त केलेली असावी. तसेच इतर पदांसाठी उमेदवारांनी ग्रॅज्युएशन पूर्ण केलेले असावे.
या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना ७५० रुपये फी भरावी लागणार आहे तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी कोणतीही फी आकारली जाणार नाही.
स्टेट बँकेतील या भरतीसाठी अर्ज कसा करावा?
या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम sbi.co.in या वेबसाइटवर जा.
त्यानंतर करिअर या टॅबवर क्लिक करा.
यानंतर SBI SCO Recruitment 2024 नोटिफिकेशनच्या लिंकवर क्लिक करा.
यानंतर संपूर्ण फॉर्म भरा. त्यानंतर कागदपत्रे अपलोड करुन फी भरावी
निवड कशी होणार?
या नोकरीसाठी उमेदवारांची निवड मुलाखत आणि सीटीईद्वारे केली जाणार आहे. ही परीक्षा १०० अंकाची होणार आहे. मुलाखतीत मिळालेल्या गुणांच्या आधारे मेरिट लिस्ट बनवली जाणार आहे. त्यानंतर उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
Discussion about this post