शिक्षण पूर्ण झालंय किंवा या वर्षी ग्रॅज्युएट होणार आहात का? तर ही बातमी खास तुमच्यासाठी. कारण स्टेट बँक फेलोशिप प्रोग्रामअंतर्गत तरुणांना इंटर्नशिप करण्याची सुवर्णसंधी आहे. यामध्ये तरुणांना स्टायपेंडदेखील मिळणार आहे. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये इंटर्नशिपसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. एसबीआय यूथ फॉर इंडिया फेलोशिप प्रोग्राम २०२५-२६ मघ्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे.
जर तु्म्हाला करिअरची सुरुवात करायची असेल तर ही तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे. स्टेट बँकेच्या पेड इंटर्नशिप योजनेसाठी तुम्ही रजिस्ट्रेशन करु शकतात. यासाठी youthforindia.org वर जाऊन ऑनलाइन अर्ज करु शकतात. ही इंटर्नशिप १३ महिन्यांची असणार आहे. या नोकरीसाठी निवड झाल्यावर उमेदवारांनी स्टायपेंड मिळणार आहे
एसबीआय यूथ फॉर फेलोशिपमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कामाचा अनुभव मिळणार आहे.एसबीआय फाउंडेशनतर्फे युवकांना ग्रामीण भारतात काम करण्याची संथी मिळणार आहे. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण अशा विविध क्षेत्रात काम करता येणार आहे.
एसबीआय फेलोशिप प्रोग्रामसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे १ ऑक्टोबर २०२५ पूर्वी बॅचलर पदवी असणे आवश्यक आहे. यासाठी भारतीय नागरिक अर्ज करु शकतात. उमेदवारांची वयोमर्यादा २१ ते ३२ वर्षे असावी.
या कालावधीत उमेदवारांना स्टायपेंड मिळणार आहे. याचसोबत इतर भत्तेदेखील मिळणार आहे. इंटर्नशिप झाल्यावर एसबीआय फाउंडेशनकडून कार्यक्रम पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र मिळणार आहे.
या इंटर्नशिपसाठी तुम्हाला youthforindia.org या वेबसाइटवरुन अर्ज करु शकतात. त्यानंतर अर्ज करा. यानंतर रजिस्ट्रेशन करा. यानंतर फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला मुलाखतीसाठी बोलावले जाईल.
Discussion about this post