बँकेत नोकरी मिळवण्यासाठी तुम्हीही धडपड करत असाल तर तुमच्यासाठी एक मोठी संधी आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर पदासाठी भरती प्रक्रिया राबविली जात आहे. तुम्ही अजूनही यासाठी अर्ज केला नसेल तर लगेचच अर्ज करा.
कारण अर्ज करण्याची करण्याची शेवटची तारीख जवळ आली आहे. या भरती तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्यासाठी तुम्हाला https://sbi.co.in/web/careers या संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑक्टोबर 2024 पर्यंत आहे.
या पदांसाठी होणार भरती?
डेप्युटी मॅनेजर (सिस्टम) प्रोजेक्ट मॅनेजनेंट आणि डिलिवरीचे १८७ पदे आहेत. तर डेप्युटी मॅनेजर इंफ्रा सपोर्ट आणि क्लाउड ऑपरेशन या पोस्टसाठी ४१२ पदे शिल्लक आहेत. दोन्ही मिळून एकूण १५११ जागांसाठी एसबीआयची ही मोठी भरती आहे.
शिक्षणाची अट काय?
उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी शिक्षणाची अट देखील तपासावी. या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे संबंधित क्षेत्रातील B.Tech, BE आणि MCA ही पदवी असली पाहिजे. तसेच M.Tech आणि M.Sc पदवी आणि या कामाचा २ ते ४ वर्षांचा अनुभव असला पाहिजे.
वयाची अट काय?
डेप्युटी मॅनेजर पदासाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीला वयाची अट – २५ ते ३५ वर्षे इतकी देण्यात आली आहे.
तसेच सहाय्यक व्यवस्थापक पादासाठी २१ ते ३० वर्षे अशी वयाची अट आहे.
फॉर्म शुल्क
अर्ज करणाऱ्या उमेदवारांमध्ये सामान्य/EWS आणि OBC यांना ७५० रुपये फी आहे. तर SC/ST आणि PWBD यांना मोफत अर्ज करता येणार आहे.
| जाहिरात (PDF) | Click Here |
| Online अर्ज | Apply Online |















Discussion about this post