सरकारी नोकरी मिळविण्यासाठी झटणाऱ्या तरुणांना सुवर्णसंधी चालून आली आहे. मध्य प्रदेशच्या पॉवर ट्रान्समिशन कंपनीमध्ये ६३३ पदांसाठी भरती होणार आहे. तर यूपीएससीनेही २४१ जागांसाठी भरती काढली आहे.
मध्य प्रदेशच्या पॉवर ट्रान्समिशन कंपनीमध्ये ६३३ पदांसाठी भरती होत आहे. मध्य प्रदेशच्या पॉवर ट्रान्समिशन कंपनीने असिस्टेंट इंजिनीअरसहित अन्य ६३३ पदांसाठी भरती काढण्यात आली आहे. या पदासाठी उमेदवाराला कंपनीच्या mptransco.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज करावा लागणार आहे.
असिस्टेंट इंजिनीअर – ६३ पदे
लॉ ऑफिसर – १ पद
ज्युनिअर इंजिनीअर (ट्रान्समिशन) – २४७ पदे
ज्युनिअर इंजिनीअर (सिव्हिल) – १२ पदे
लाइन अटेंडेंट – ६७ पदे
सबस्टेशन अटेंडेंट – २२९ पदे
सर्व्हेयर अटेंडेंट – १४ पदे
शैक्षणिक पात्रता काय?
संबंधित विषयात डिग्री, डिप्लोमा
वयोमर्यादा
किमान वय – १८
कमाल वय – ४० वर्ष
आरक्षित गटातील उमेदवारांसाठी वयात सूट देण्यात आली आहे.
पगार किती मिळणार?
१९,५०० – १,७७,५०० रुपये/ प्रति महिना
यूपीएससीकडून काही जागांसाठी भरती
यूनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणजे यूपीएससीने सायंटिफिक ऑफिसरसहित २४१ पदांसाठी भरती काढण्यात आली आहे. उमेदवाराला यूपीएससीच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज करावा लागणार आहे.
शैक्षणिक पात्रता
पदवी, इंजिनीअर विषयातील पदवी
संबंधित पदाच्या कामाचा अनुभव
अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय किमान ३० ते कमाल ५० वर्ष असावे
आरक्षित गटातील उमेदवारांना वयात सूट देण्यात आली आहे.
पगार
वेतन – आयोग ८ ते ११ व्या वेतन आयोगानुसार पगार मिळेल.
Discussion about this post