तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. आयकर विभाग, सीआयएसएफ आणि काही सरकारी बँकमध्ये नोकरी निघाला आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहे. तुम्हीही या भरतीसाठी इच्छुक असाल तर अधिकृत नोटिफिकेशन वाचून सर्व माहिती जाणून घ्या अन् मगच अर्ज करावा. पात्रता आणि आवडीप्रमाणे तुम्ही अर्ज करू शकता.
CISF मध्ये भरती
CISF द्वारे कॉन्स्टेबल पदासाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. CISF द्वारे तब्बल ११६१ जागांवर भरती निघाली आहे, त्यासाठी ३ एप्रिलपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता. अर्ज करण्यासाठी मान्यताप्राप्त बोर्डातून दहावी पास असणं अनिवार्य आहे. एक ऑगस्त २०२५ पर्यंत अर्जदाराचे वय १८ ते २३ वर्ष इतके असावे.
बँक ऑफ बडोदा, ५१८ जागा –
बँक ऑफ बडोदामध्ये स्पेशलिस्ट अधिकाऱ्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. २१ मार्चपर्यंत अर्ज करण्याची मुदत असेल. बँक ऑफ बडोदामध्ये वेगवेगळ्या पदासांठी ५१८ जागांवर भरती निघेल. अर्ज करण्याआधी बँकेकडून निघालेली अधिकृत जाहिरात वाचावी.
आयकर विभाग –
आयकर विभागात मल्टी-टास्किंग स्टाफ, टॅक्स असिस्टंट आणि स्टेनोग्राफर या पदांसाठी अर्ज करू शकता. आयकर विभागाकडून अधिकृत जाहीर निघाली आहे. पाच एप्रिलपर्यंत अर्ज करण्याची मुदत असेल. आयकर विभागात ५६ पदासाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. २५ हजार ते ८१ हजार पर्यंत वेतन असेल.
Discussion about this post