तुम्हालाही निवृत्तीनंतर चांगल्या भविष्याची काळजी वाटत असेल, तर एलआयसीची सरल पेन्शन योजना उपयुक्त ठरू शकते. एलआयसी सरल पेंशन ही अशी पेन्शन योजना आहे ज्यामध्ये गुंतवणूक करून तुम्ही अल्पावधीतही पेन्शनचा लाभ घेऊ शकता.
या योजनेत गुंतवणूक केल्यानंतर तुम्हाला दर महिन्याला १२ हजार रुपये पेन्शन मिळणार आहे. या योजनेत तुम्हाला फक्त एकदाच पैसे भरावे लागतात. त्यानंतर तुम्हाला दर महिन्याला १२ हजार रुपये मिळणार आहे.
वयाच्या ६० व्या वर्षी जर तुम्ही या योजनेत १० लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला वर्षाला ५८,९५० रुपये मिळतील. या योजनेत मिळणारी रक्कम गुंतवणूकीच्या रक्कमेवर अवलंबून असते.
एलआयसी सरल पेन्शन योजना तुम्ही ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही स्वरुपात घेऊ शकता. या योजनेत तुम्हाला १२००० रुपयांची गुंतवणूक करु शकतात. जास्तीत जास्त पैसे गुंतवणूकीवर मर्यादा नाही. ही योजना ४० ते ८० वयोगटातील लोकांसाठी आहे.
सरल पेन्शन योजनेत लाइफ अॅन्युटीसह १०० टक्के रिटर्न ऑफ परचेस प्राइज मिळणाप आहे. ही एक सिंगल पेमेंट पॉलिसी आहे. एकाच व्यक्तीसाठी ही पॉलिसी असेल. पॉलिसीधारक जोपर्यंत जिवंत आहे. तोपर्यंत त्यांना ही पेन्शन मिळणार आहे.
Discussion about this post