मुंबई : लग्नसराई असो वा सण यादरम्यान देशातील बहुतांश लोक सोने चांदी खरेदी करतात. मात्र गेल्या काही काळात जागतिक पातळीवर झालेल्या दरवाढीने देशांतर्गत सराफ बाजारात सोने चांदीच्या किंमतीनी नको तो विक्रम करून ठेवला आहे. यामुळे ग्राहकांचा सोनं चांदी खरेदी करण्याचा कल कमी झालेला दिसून येत. आज तुम्ही सोने चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर नवीनतम दर तासून घ्या..
गुडरिटर्न्सने जाहीर केलेल्या किंमतीनुसार आज 19 मे रोजी सकाळच्या सत्रात भावात कोणताच बदल दिसून आला नाही. 22 कॅरेट सोने 56,250 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेटचा भाव 61,350 रुपये प्रति 10 ग्रॅमइतका आहे.
दरम्यान, मे महिन्यात सोने-चांदीला मोठी उसळी घेता आलेली नाही. सोन्याने 62,000 रुपयांचा टप्पा ओलांडला असला तरी सोने 65,000 रुपयांचा टप्पा गाठण्याची शक्यता मावळली आहे. चांदीने 78,000 रुपयांचा टप्पा गाठला होता. पण त्यापुढे चांदीला मजल मारता आलेली नाही. आठवडाभरात सोने एक हजाराने तर चांदी जवळपास 4 हजार रुपयांनी गडगडली.
24, 23, 22 कॅरेटचा भाव
ibjarates.com नुसार, 24 कॅरेट सोन्याचा भाव 60,474 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. 23 कॅरेटचा भाव 60,232 रुपये तर 22 कॅरेटचा भाव 55,394 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. 18 कॅरेट सोन्याचा भाव 45,356 रुपये होता. हे भाव काल संध्याकाळचे आहेत.
Discussion about this post