बीड । आज महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर झाला. यात मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या लेकीचा बारावीचा निकाल समोर आला आहे. वैभवी देशमुख हिला बारावीला ८५. ३३ टक्के मिळाले आहेत.
संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. आपल्या वडिलांना न्याय मिळावा यासाठी संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख हिने महाराष्ट्रभर आंदोलन केले. नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या. वैभवीचे हे बारावीचे वर्ष होते. त्यामुळे डिसेंबरपासून वडिलांना न्याय मिळावा यासाठी फिरणाऱ्या वैभवीची परीक्षेत कामगिरी कशी असणार याची उत्सुकता होती. वैभवीने आपल्या गुणांनी सगळ्यांना चकीत केले. बारावीमध्ये तिला तब्बल तिला 85.33 टक्के गुण मिळवले आहेत.
निकाल लागल्यानंतर वैभवी देशमुख हिने प्रतिक्रिया दिली, ‘आज मिळालेले गुण आनंद देणारे असले तरी, वडिलांच्या अनुपस्थितीने तो आनंद अधूरा आहे. त्यांच्या आशीर्वादाने आणि सर्वांच्या साथीने हे यश मिळवता आलं. दुखा: च्या अशा डोंगरांना आम्ही कधीच सामोरे गेलो नव्हतो. पण आता त्यांच्या स्वप्नांना पूर्ण करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे’, अशी प्रतिक्रिया वैभवीने दिली.
Discussion about this post