Thursday, March 5, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

संजय सावकारेंचे डिमोशन! भंडाऱ्याच्या पालकमंत्रीपदावरून हटवलं, राजकीय वर्तुळात खळबळ

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
August 26, 2025
in जळगाव जिल्हा
0
संजय सावकारेंचे डिमोशन! भंडाऱ्याच्या पालकमंत्रीपदावरून हटवलं, राजकीय वर्तुळात खळबळ
बातमी शेअर करा..!

मुंबई । महायुती सरकारने मध्यरात्रीच भाकरी फिरवीत भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री बदलण्याचा निर्णय घेतला. संजय सावकारे यांच्या जागी आता पंकज भोयर यांच्याकडे भंडाऱ्याचे पालकत्व देण्यात आले आहे. मंत्री संजय सावकारे यांचे अचानक करण्यात आलेल्या डिमोशनमुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरु आहे. दरम्यान संजय सावकारे यांच्याकडे आता बुलढाणा जिल्ह्याच्या सहपालकमंत्रीपदाची जबाबदारी दिली आहे.

सोमवारी रात्री राज्याचे उपसचिव दिलीप देशपांडे यांनी जारी केलेल्या शासन आदेशानुसार, भंडारा जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरून संजय सावकारे यांना हटवण्यात आले आहे. त्यांच्या जागी वर्धा जिल्ह्यातील पंकज भोयर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सावकारे यांना आता बुलढाण्याचे सहपालकमंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे भंडाऱ्यातील राजकीय समीकरणांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

पालकमंत्रीपदावरून हटवण्याचं नेमकं कारण काय?

संजय सावकारे यांच्या पालकमंत्रीपदावरून हटवण्यामागे भंडारा जिल्ह्यातील नागरिकांमधील तीव्र नाराजी हे प्रमुख कारण मानले जाते. सावकारे, जे जळगाव येथील रहिवासी आहेत, भंडारा जिल्ह्यात फारसे सक्रिय नव्हते. त्यांचा दौरा केवळ 15 ऑगस्ट, 26 जानेवारी किंवा जिल्हा नियोजनाच्या बैठकींपुरता मर्यादित होता. यामुळे नागरिकांच्या अनेक समस्या प्रलंबित राहिल्या होत्या. विशेषतः भंडाऱ्यातील पूरपरिस्थितीनंतरही सावकारे यांनी जिल्ह्याला भेट दिली नाही, ज्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला होता.

नागरिकांनी स्थानिक किंवा जवळच्या जिल्ह्यातील नेत्याला पालकमंत्रीपद देण्याची मागणी सातत्याने केली होती. सावकारे यांचा जिल्हा विकासासाठी ठोस निर्णय घेण्यात कमी पडलेला दृष्टिकोन आणि त्यांचा भंडाऱ्याशी असलेला तुटलेपणा यामुळे त्यांच्याविरोधात असंतोष वाढत होता. याशिवाय, शिंदे गटाचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांची भंडाऱ्यातील वाढती ताकद भाजपसाठी चिंतेचा विषय ठरली होती. या सगळ्या पार्श्वभूमीवर सावकारेंना हटवण्याचा निर्णय घेण्यात आला.

बातमी शेअर करा..!
Previous Post

लिलाबाई महादेव पवार यांचे अल्पशा आजाराने निधन

Next Post

बापरे! धावत्या महाराष्ट्र एक्स्प्रेसमध्ये महिलेचा विनयभंग, पाच आरोपी अटकेत, दोन अल्पवयीनांचा समावेश

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
जळगावातील नात्याला काळिमा फासणारी घटना ! आईबरोबर मुलाने केले लज्जास्पद कृत्य

बापरे! धावत्या महाराष्ट्र एक्स्प्रेसमध्ये महिलेचा विनयभंग, पाच आरोपी अटकेत, दोन अल्पवयीनांचा समावेश

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
देशाच्या राजकारणात मोठा उलटफेर; बिहारचं मुख्यमंत्रिपद भाजपकडे? नितीश कुमारांचं काय?

देशाच्या राजकारणात मोठा उलटफेर; बिहारचं मुख्यमंत्रिपद भाजपकडे? नितीश कुमारांचं काय?

March 4, 2026
उन्मेष पाटीलांच्या डाेक्यावर परिणाम, त्यांना वेड्या सारखे बडबड करायची सवय ; गिरीश महाजन

ठाकरे गटातून शिंदे गटात? उन्मेश पाटलांच्या पक्षांतरावर मंत्री महाजनांची प्रतिक्रिया, म्हणाले..

March 4, 2026
BSNL मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी, पगार ५०,००० रुपयांपर्यंत, पात्रता त्वरित जाणून घ्या

भारत संचार निगम लि.मध्ये सरकारी नोकरीची संधी; या पदासाठी भरती सुरु, पात्रता तपासून घ्या

March 4, 2026
जळगावात गारठा कमी होऊन तापमान वाढणार ; वाचा हवामान खात्याचा अंदाज

जळगावात हवामानाचा लहरीपणा; २४ तासांत तापमानात मोठी तफावत

March 4, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page