जळगाव । जळगावमध्ये महाविकास आघाडीतील शरद पवार गटाचे रावेरचे उमेदवार श्रीराम पाटील आणि जळगावचे ठाकरे गटाचे उमेदवार करण पवार पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत जळगावमध्ये आले होते. यावेळी जळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर महाविकास आघाडीची सभा झाली. यावेळी संबोधित करताना संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधत मोदी सरकारला थेट इशारा दिला आहे. ‘आम्हाला जेलमध्ये टाकले आता तुमचा नंबर.’, असा इशारा दिला.
ते म्हणाले, ‘महाराष्ट्र लुटायचे म्हणून यांनी दोन पक्ष फोडले. ४०० पार नाही तर आम्ही तडीपार करू. ४०० पारचे जनता ठरवेल. मुंबई महाराष्ट्रामध्ये नको म्हणून मोदी गुजरातला नेण्याचा प्रयत्न करत आहेत. पण आता मोदी येणार नाही. खोक्याचा हिशेब शांत करू. आम्हाला जेलमध्ये टाकले आता तुमचा नंबर आहे.’, असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.
‘मोदी देशभर गॅरेंटी देत आहेत. तुम्ही विजय होणार का त्याची गॅरेंटी नाही. तु्न्ही काय केले त्याचा हिशोब द्या. आपल्या विकासाचा वाटा हे गुजरातला नेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांचा बदला घेण्याची वेळ आली आहे. २५० खोके घेऊन घरात बसलेले नेते आपली सभा पाहत आहेत.’ असा टोला मारत संजय राऊत यांनी ‘महाविकास आघाडीचे उमेदवार दोन्ही पाटलांना विजयी करा.’, असे आवाहन जळगावकरांना केले आहे.
त्यांनी पुढे सांगितले की, ‘महाराष्ट्र पवित्र करण्याची वेळ आली आहे. चार जूननंतर यांना बाहेर फिरता येणार नाही. निवडणूक होईपर्यंत तुतारी आणि मशाल घरा घरात पोहोचवा.पान टपरीवाल्याला बाळासाहेबांनी मंत्री केले. त्याला घरी बसवायची वेळ आली आहे.’, अशी टीका संजय राऊत यांनी गुलाबराव पाटील यांच्यावर केली. त्याचसोबत, ‘निष्वतंत ताकद काय असते हे दाखवून द्या.’, असे देखील त्यांनी सांगितले.















Discussion about this post