मुंबई । शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल मोठा दावा केला आहे. त्यांनी म्हटले आहे की पंतप्रधान मोदींचा उत्तराधिकारी महाराष्ट्रातून असणार आहे. त्यांनी या चर्चा पंतप्रधानांच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाच्या भेटीशी देखील जोडल्या आहेत. तथापि, भारतीय जनता पक्ष किंवा संघाकडून याबद्दल अधिकृतपणे काहीही सांगण्यात आलेले नाही. मात्र संजय राऊत यांच्या या विधानाने अनेकांच्या भुवया उंचावल्या असून राजकीय वर्तुळात नवी चर्चा सुरू झाली आहे.
पंतप्रधान मोदींच्या उत्तराधिकाऱ्यांबाबत नागपुरात चर्चा झाल्याचा दावा राऊत यांनी केला. ते म्हणाले, ‘आरएसएस पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उत्तराधिकारी निवडेल. म्हणूनच मोदींना नागपूरला बोलावण्यात आले जेणेकरून या विषयावर बंद दाराआड बैठकीत चर्चा करता येईल. असं ते म्हणाले
तुम्ही जे एक धोरण स्वत:साठी तयार केलं आहे, आपल्या सहकाऱ्यांसाठी, भाजपसाठी धोरण केलं आहे, की 75 व्या वर्षी निवृत्त व्हावं लागेल आणि तुम्हाला केदारनाथच्या गुंफेत जावं लागेल. फकीर आदमी है, झोला लेकर आया था. झोला भरकर जाएगा. झोला बहूत भरा है उनका, असंही राऊत म्हणाले.
राऊतांच्या विधानावर काय म्हणाले देवेंद्र फडणवीस ?
संजय राऊत यांच्या या विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट प्रतिक्रिया दिली. ‘मोदींचा उत्तराधिकारी शोधण्याचं कोणतंही कारण नाही, मोदीजी आमचे नेते आहेत. अजून बरीच वर्ष ते काम करणार आहेत, आमच्या सगळ्यांचा आग्रह आहे , 2029 चे पंतप्रधान म्हणून आम्ही नरेंद्र मोदी यांच्याकडेच पाहतो आहोत. पूर्ण देशही तेच बघत आहे, त्यामुळे आत्ता अशी चर्चा करणं योग्य होणार नाही. भारतीय संस्कृतीमध्ये वडील जिवंत असताना मुलांचा विचार होत नाही, करायचाही नसतो. ही सगळी मुघल संस्कृती आहे, त्यामुळे आत्ता कोणाचाही, कुठेही उत्तराधिकारी निवडण्याची वेळही आलेली नाही, तसा प्रश्नही नाही. जोपर्यंत माझा विषय आहे, मााझा त्याच्याशी संबंध नाही’, असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केलं.
Discussion about this post