मुंबई । लडाखच्या दौऱ्यावर गेलेले काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रविवारी (२० ऑगस्ट) दावा केला की चिनी सैन्याने लडाखमध्ये घुसखोरी केली आहे. राहुल गांधींच्या विधानाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि खासदार संजय राऊत यांनी पाठिंबा दिला आहे. पंतप्रधान आणि संरक्षणमंत्र्यांनी याप्रकरणी दिशाभूल करण्यापेक्षा सत्य सांगावे, असे राऊत म्हणाले.
काय म्हणाले संजय राऊत?
राहुल गांधी देशाचे प्रमुख नेते आहेत, ते खासदार आहेत, ते काँग्रेसचे माजी अध्यक्ष आहेत. त्यांनी एखादी गोष्ट मांडली तर ती काळजीपूर्वक मांडतात. चीनने आपल्या जमिनीवर कब्जा केल्याचे राहुल गांधींनी म्हटले असेल, तर जनतेची दिशाभूल करण्याची गरज नाही, मग ते पंतप्रधान असो किंवा संरक्षण मंत्री, जनतेला सत्य सांगा. असे राहुल म्हणतात.
‘चीनने लडाखमध्ये घुसखोरी करून कब्जा केला आहे. याचे पुरावेही समोर आले आहेत, पण आपले संरक्षणमंत्री, आपले पंतप्रधान हे मान्य करायला तयार नाहीत, त्यामुळे आपण भारतमातेवर अन्याय करत आहोत, असे दिसते असंही संजय राऊत म्हणाले.
Discussion about this post