मुंबई । दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेसाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह शिवसेनेत नेते आणि उद्योग मंत्री उदय सामंत हे गेले. मात्र उदय सामंत हे दावोस येथे गुंतवणूक आणायला गेले नसून, आमदार फोडाफोडी करण्यासाठी गेले असल्याचा खळबळजनक दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलाय. तसेच उदय सामंत यांचं आता पितळ उघडे पडल्यामुळे ते आता सारवासारव करत असल्याचा आरोपही संजय राऊत यांनी केलाय.
काय म्हणाले संजय राऊत?
संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत उदय सामंत यांच्यावर अनेक आरोप केले आहेत. दावोसमध्ये बसून शिवसेनेचे किती आमदार, खासदार भेटले, काँग्रेस पक्षातील किती आणि कोण भेटले, हे सांगण्याची गुंतवणूक करत आहेत. मुख्यमंत्र्यांनी त्यांना ताबडतोब मुंबईला पाठवायला पाहिजे, असे संजय राऊत म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांनी उदय सामंत यांच्याकडून दावोस दौऱ्याचा खर्च वसूल करायला हवा. दावोस ही राजकारण करण्याची जागा नसल्याचंही संजय राऊत म्हणाले.
उदय सामंत यांना दिल्लीचा आशीर्वाद आहे. एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीस यांना नकोसे झालेत, उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही नकोसे होतील. भाजपचे अंतरंग मी ओळखले आहेत. अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण आडवाणी आणि प्रमोद महाजन होते, तेव्हा आमचे बरे चालले होते. पण गेल्या १० वर्षात दिल्लीत आणि महाराष्ट्रात कटकारस्थान रचण्यात येत होते, असेही संजय राऊत म्हणालेत.
Discussion about this post